फेसबुक पेज Hack होण्यापासून वाचवा

हेकिंग म्हटले कि सगळे हल्ली घाबरून जातात. आपण एक एक भयाण प्रसंग वृत्तपत्रात वाचतोच. जसे कि बँकेचे आकाउंट hack झाले,  wats app hack  झाले, फेसबुक व गीमेल चे हेकिंग चे किस्से वर वर ऐकतोच आपण. क्रेडीट कार्ड फ्रौड आणि SMS फ्रौड तर आजकाल नेहमीचेच झाले आहे.

आज आपण अश्या हेकिंग करणाऱ्या लोकांपासून सुरक्षित कसे राहू शकतो ते पाहूया.
आपले फेसबुक आकाउंट सुरक्षित आहे का?
फेसबुक वर आज अप्प्ल्याला आपले जुने, नवीन मित्र मैत्रिणी सगळे भेटतात. एखाद्या अनोळख्या व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारतो. पण हे आपल्या फेसबुक आकाउंटसाठी सुरक्षित आहे का? याचा देखील विचार आपण केला पाहिजे. आपण फेस्वूकवर लोगिन करतानाwww.facebook.com टाकतो, लोगिन करतो व पुढे जे काही chating, सर्फिंग, पेज लाईक, फोटो लाईक, याला शोध त्याला शोध, सगळे काही तासंतास करत असतो. या सगळ्याचे नोटिफिकेशन आपल्याला इमेलवरही येत असतात, जसे कि अमुक एखादा आपला फोटो एका मित्राने किवा मैत्रिणीनी लाईक केला, त्यावर कमेंट केली, तुमच्या वोलवरच्या पोस्ट एखाद्याने कमेंट केली , अश्या निरनिराळ्या गमती जमती चालू असतात.

हेकर लोक एक फेसबुक सारखा दिसणारा पेज बनवतात पण तो फास्बुकचा नसतो तर तो त्याच्या सारखा दिसणारा असतो. याला फिशिंग (Phishing) असे म्हणतात, हा एक हेकिंगचा प्रकार आहे. जेव्हा नेहमी आपण लोगिन करतो तेव्हा आपण गुगल क्रोम, इंटरनेट एक्प्लोरर किवा इतर कुठल्याही ब्रावसर च्या अड्रेस (address) टाकतो www.facebook.com, पण फिशिंग चे पेज तसे नसते, तेwww.faacebook.com किवा www.faceb00k.com असा एखादा शब्द बदल करून तो फेक पेग टाकतात.
उदा: https://www.facebook.com  – खरा पेज
http://www.facebook.com – फेक पेज

facebook1

 

आता आपल्याला फेक पेज आणि फेस्बुक्चे खरे पेज यातला फरक समजला असेल असे मी गृहीत धरतो आणि पुढे जातो.

जेव्हा आपल्या इमेल वर आपल्याला नोटीफिकेशंस येतात, त्यातला एखादा इमेल या हेकरसचा असू शकतो.
त्यामध्ये लिहिले असेल कि तुमचे फेसबुक आकाउंट २४ तासात बंद होईल, आशिक माहितीसाठी इथे क्लिक करून लोगिन करा, आणि मग खरी गम्मत चालू होते, आपण क्लीक करतो, आणि फासिबुक सारखे दिसणारे पेज उघडते, नीट वाचा, फेसबुक सारखे दिसणारे, फेसबुकचे नाही. काही वेळा त्या इमेल मध्ये आपल्याला आवडणाऱ्या नटाचा किवा नटीचा, तर कीही वेळेला आपल्या आवडत्या गाड्यांचा फोटो असतो आणि त्यावर जेव्हा आपण क्लीच्क करतो तेव्हा ते फेसबुक सारखे दिसणारे पेज उघडते. थोडक्यात काय तर आपल्याला आवडणारी कोणत्याही गोष्टीचा, व्यक्तीचा अथवा प्राण्याचा फोटो पाठवला कि नक्कीच आपण त्यावर डोळे झाकून क्लिक करतो, म्हणजेच तो मेल कोणी पाठवला ?, कुठून आला असेल ?, हा फेक मेल तर नाही ना? या सगळ्याचा विचार देखील नाही करत.

जेव्हा आपण या फेक पेजवर क्लिक करतो, आपले युसरनेम आणि पासवर्ड टाकून लोगिन वर क्लिक करतो, तेव्हा ते लोगिन न होता, टी माहिती हेकेर्सकडे जाते, आणि आपल्याला उसेर्नेम किवा पासवर्ड चुकीचा आहे असा संदेश दिसतो. आणि मग तोच फेक पेज फेस्बुक्च्या खर्या पागे वर नेऊन पोचतो. आपल्याला वाटते आपण काही चुकीचे पासवर्ड टायीप केला असेल, मग आपण परत टायीप करतो, त्यावेळी व्यवस्तीत लोगिन होते आणि आपण परत त्या फेसबुकच्या जाळ्यात गुंतले जातो. या सगळ्यात आपल्याला काळत सुद्धा नाही कि आपण आपले पासवर्ड आणि युसार्नेम कोणाला तरी नकळत दिले आहे. काय झालात न आश्चर्य चकित ?

ह्या हेकार्स पासून कसे वाचाल ?
काही काळजी करू नका, आपण या हेकार्स पासून वाचू शकतो. लोगिन केल्यावर उज्या बाजूला वर सेटीन्ग्सला क्लिक करा. त्यामध्ये General, Security, Privacy असे options असतात. त्यामध्ये Security वर क्लिक करा. Security मध्ये Secured Browsing वर बरोबर चिन्हावर क्लिक करा.
त्याने तुम्ही https://www.facebook.com वर लोगिन कराल नेहमी. https चा s म्हणजे secured (सुरक्षित).
दुसरे option म्हणजे त्याच्याच खाली लोगिन नोटीफिकेश्न्स.

लोगिन नोटिफिकेशन:
त्यामध्ये इमेल आणि टेक्स्ट मेसेज अथवा पुश नोटिफिकेशन वर बरोबर चिन्हावर क्लिक करा. आपला भ्रमणध्वनी क्रमांक टाका. याचा फायदा असा होईल कि जेव्हा जेव्हा तुम्ही कुठेही लोगिन कराल तेव्हा तुम्हाला फोन वर SMS व इमेल येईल ते सुद्धा IP address सकट, म्हणजेच त्याचा रेकोर्ड तुमच्याकडे असेल.

fb2

त्या options मध्ये recognized devices मध्ये जर मोबाईल मधून किवा इतर कुठल्याही संगणकावरून लोगिन केले असले तर त्याचा रेकोर्ड दिसतो व तेही तारखेप्रमाणे. Active Sessions नावाच्या ओप्तीओन मध्ये तर तुम्हाला स्थळ, डीव्हाहीसचे नाव, शेवटचे कधी लोगिन केले, असे सगळी माहिती दिसते.

उदा: Last accessed: August 26 at 4.40 pm
Device Name: Chrome on Windows 7 किवा Blackberry
Location: Bandra West, MH, IN (Approx)

अश्या तर्हेने तुम्ही तुमच्या फेसबुक खाते hack होण्यापासून थांबवू शकता. आपल्या फेसबुक किवा कुठल्याही ऑनलाईन खात्याची काळजी आपणच घ्या. कोणालाही पासवर्ड किवा आयडी देऊ नका.
सतर्क राहा, सुरक्षित राहा!