सोशल सेलिंग

social-selling

आपण २०१४ च्या युगात जगतोय, सेल्सच्या पद्धती खूप वेगळ्या आणि झटपट बदलतायत. या नवीन आणि परिणामकारक सोशल सेलिंगच्या युगात आपले स्वागत. मी आपल्या पुढे या लेखाच्या माध्यमातून सोशल सेलिंगच्या युगातले काही सत्य समोर मांडणार आहे.

हा पूर्ण लेख GE Capital Retail Bank या संस्थेच्या अभ्यासपूर्ण संशोधनातून घेतलेला आहे.

१. जगातील ८१ % लोक एखादा माल खरेदी करण्यापूर्वी इंटरनेटवर ऑनलाइन पडताळणी करतात.

२. जगातील ६० % ग्राहक एखाद्या गोशिटची माहिती मिळवण्यासाठी थेट वेबसाईटवर न जाता सर्च इंजीनचा वापर करतात.

३. जगातील ७९ % ग्राहकांना असा विश्वास आहे कि टेक्नोलोजीमुळे उत्तम आणि अचूक माहिती मिळते व त्यामुळे त्यांची फसवणूक टळते.

४. जगातील ७२ % ग्राहक (बी २ बी ग्राहक) असे करतात कि जो व्यवसायाला लागणारा माल विकत घेण्यापूर्वी गुगलवर सर्च करतात. गुगल सर्च व्यतिरिक्त, बी २ बी ग्राहक १५.५ % इतर नेटवर्क चा सुद्धा वापर करतात. तसेच लिंक्ड इन नेटवर्कचा २.५ % वापर करतात.

तुम्ही तुमच्या भविष्यातील व्यवसाय सुरु करण्या आधी व्यवसायाला लागणाऱ्या गोष्टी कुठून व कुठल्या माध्यमातून खरेदी करता ?

गुगल ७१.६७ %

बिंग २.७६ %

याहू ५.५३ %

सोशल नेटवर्क्स २.०१ %

लिंक्ड इन २.५१ %

वय्याक्तिक नेटवर्क १५.५८ %

तुम्हाला तुमच्या व्यवसायात अजून यश मिळवण्यासाठी वरील गोष्टी अमलात आणून व्यवसायात बदल घडवू शकता.