बी टू बी मार्केटिंगसाठी लिंक्ड इन कसे वापराल ?

लिंक्ड इन कडे ३०० मिलियन लोकांची माहिती आहे, म्हणजेच ३०० मिलियन लोकांनी तिथे त्यांची नोंद केली आहे. फेसबुक व ट्विटर सुद्धा या स्पर्धेत पुढे आहेत, परंतू ह्यांची बी टू सी विकण्यासाठी जास्त मधात होते. लिंक्ड इन हे बी टू बी मार्केटर्ससाठी खूप मोठे व्यासपीठ आहे, जिथे त्यांना हवे टे टार्गेट ग्राहक मिळू शकतात. लिनक्स इन च्या माहिती प्रमाणे अंदाजे ३१,००० लोक एखाद्या पोस्टला पाहतात व २५० लाईकस आणि ८० कमेन्टस असतात. अंतिमतः या सगळ्याचा हेतू आहे सेल्स काढणे.

तुम्ही जर उद्योजक असाल किवा एखाद्या कंपनीचे शुभचिंतक असाल तर लिंक्ड इन चा तुमच्या व्यवसायासाठी कसा वापर केला पाहिजे. हे मी या लेखाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतोय.

नियमित हाय वेल्यू कंटेंट पोस्ट करा

इतर सोशल मिडिया प्लेटफोर्मस प्रमाणे लिंक्ड इन ला सुद्धा नियमित कंटेंट पोस्ट करावा लागतो. तो कंटेंट उत्तम दर्जाचा व तुमच्या क्षेत्राशी निगडीत असणे गरजेचे आहे, तरच त्याचा परिणाम वाचकांवर जास्तीत जास्त पडेल. नियमित पोस्ट करणे म्हणजे नक्की किती दिवसांनी ? हा प्रश्न तुम्हा पडला असेल. तर आठवड्यातून कमीत कमी दोनदा व जास्तीत जास्त तुमच्या फॉलोअर्सच्या मागणी नुसार. त्या पोस्ट च्या साईझेस फीट होणार्या असल्या पाहिजेत.

ग्रुप डिस्कशन मधून आयडियास शोधा

तुम्हा जर लिंक्ड इन वर नियमित पोस्ट करायचे असेल तर नवीन कंटेंट तर लागणारच जो तुमच्या क्षेत्राशी निगडीत वेगवेगळे विषय मांडून तुमच्या वाचकांना एक उत्तम दर्जाचे पोस्ट वाचायला उपलब्ध करेल. हा सगळा नव नवीन मजकूर तुम्हाला काही डिस्कशन ग्रुप्सवर मिळेल. त्यातले तुमच्या व्यवसायाच्या निगडीत ग्रुप्स जॉईन करा, तिथल्या ग्रुप डिस्कशनस मध्ये सहभागी व्हा व त्या ग्रुप्सच्या सभासदान मध्ये तुमचे पोस्ट पसरवा.

तुमच्या इंडस्ट्री बद्दल बोला

तुमच्या पोस्ट्स नेहेमी स्पेसिफिक असल्या पाहिजेत. तुमच्या वाचकांची गरज जाणून घ्या व त्या नुसार तुमच्या पोस्टिंग मध्ये बदल घडवून आणा. तुमच्या पोस्ट एकदमच मार्केटिंग वाल्या वाटल्या नाही पाहिजेत किवा फक्त तुमच्या कंपनी बद्दल बोलणार्या नसल्या पाहिजेत. प्रत्येक पोस्ट करताना तुमच्या वाचकांना त्याचा काय फायदा होईल याचा विचार तुम्ही केला पाहिजे. त्यांना काही त्यांच्या उपयोगाचे वाटले तरच तुमच्या पोस्टला चांगला प्रतिसाद मिळणार आहे. उदाहरण द्यायचे झाले तर, तुम्ही एखादी डिजिटल मार्केटिंग कंपनी असाल, तर त्या विषयाला अनुसरून टिप्स शेयर करा ज्यातून तुमचे कौशल्य वाचकान पर्यंत पोहोचेल. तुमच्या वाचकान मध्ये विश्वसनीयता निर्माण करण्यासाठी हा एक चांगला मध्यम आहे. एकदा का लोकांना तुमच्या पोस्ट्सची किवा तुमच्या कंटेंटची सवय लागली कि तुम्ही मार्केटिंगचा किवा प्रोडक्ट सेलिंगची पोस्ट टाकली तरी वाचक ती स्वीकारतात.

स्टोरीटेलिंगच्या मध्यमातून वाचकांना गुंतवा

गोष्टी कोणाला नाही आवडत ? सगळ्यांना गोष्टी आयकायला आवडतात. तुमच्या ग्राहकांना किवा वाचकांना तुमच्या ब्रांडशी भावनिक रित्या जोडण्यासाठी स्टोरीटेलिंग हि एक प्रभावशाली  पद्धत आहे. जास्तकरून जे मोटीवेशानल कंटेंट असतात ते सुद्धा या पद्धतीचा वापर करतात. लिंक्ड इन च्या माध्यमातून तुम्ही तुमच्या टार्गेट ग्राहकांना किवा वाचकांना स्टोरीटेलिंगच्या माध्यमातून तुमच्या ब्रांड मध्ये सहभागी करून किवा गुंतवून घेऊ शकता. अश्या ज्या पोस्ट्स असतात त्यांचे शेअर्स, लाईकस व कमेंट्स इतर पोस्ट्स पेक्षा जास्त असतात. म्हणजेच लोकांचे या पोस्ट्स मध्ये गुंतवणूक (इंगेज्मेंट) जास्त असते.

लिंक्ड इन चा ट्राफिक तुमच्या वेबसाईटवर न्या

लिंक्ड इन एक असा सोशल मिडिया आहे जिथे इंगेज्मेंट जास्तीत जास्त असते. या संधीचा फायदा घेऊन तुम्ही जास्तीत जास्त लोक तुमच्या वेबसाईट किवा ब्लोग ला नेऊ शकता. प्रत्येक पोस्ट जी तुम्ही लिंक्ड इन वर करता त्या पोस्ट सोबत तुमच्या वेबसाईट किवा ब्लॉगची लिंक असणे गरजेचे आहे. तरच टे फायदेशीर ठरणार आहे. सोशल मिडियाचे तीन महत्वाच्या गोष्टी आहेत, कंटेंट, इंगेज्मेंट आणि त्यातून कन्वर्शन (सेल्स). जर तुम्ही ती लिंक दिलीत तर ग्राहक किवा वाचक अधिक माहिती साठी त्या वेबसाईट किवा ब्लॉगवर येऊन तुमच्या प्रोडक्ट्स किवा सर्विस बद्दल अजून माहिती वाचून किवा बघून तुमच्याशी संपर्क साधतील. म्हणजेच आपले अंतिमतः जो लिंक्ड इन वर पोस्ट करण्याचा हेतू होता तो सध्या होईल.