Facebook मार्केटिंग न चालण्याची करणे व त्यावरील उपाय

944315_997500606954021_7773435723528328384_n

१ले कारण : पुरेसे फोलोवर्स नसणे
जेवढे जास्त फोलोवर्स तेवढ्या जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकाल. निश्चित करा कि तुम्ही सगळ्या फ्रेंड लिस्ट ला तुमचे बिसनेस पेज लाईक करण्यासाठी इन्व्हाईट करता आहत. तुमच्या वेबसाईट वर एक फेसबुक लाईकचे बटन असणे महत्वाचे आहे. फेसबुक पेज द्वारे आपल्या व्यवसायाची जाहिरात करणे व त्याला जास्त लाईक मिळवणे हि एक परिणामकारक आणि खर्चिक नसलेली पद्धत आहे.

२ रे कारण : तुमच्या पोस्ट्स
अश्या पोस्ट लोकांना आवडतात ज्या त्यांच्या उपयोगाच्या असतील, त्यांना हसवतील किवा माहिती देतील. तुम्ही जर लोकांना जे वाचायचं ते नाही टाकला तर ते तुम्हाला डिस लाईक करतील.
फेसबुक वरील तुमच्या प्रत्येक पोस्त चा हेतू असला पाहिजे कि जास्तीत जास्त लाईक, शेअरस आणि कमेंट मिळवणे. ज्या पोस्ट्स प्रसिद्ध असतात त्या मध्ये जोक्स, प्रेरणादायी गोष्टी, छान फोतोस व वीडीओस चा समावेश असतो. तुम्ही ज्या काही गोष्टी शेअर कराल त्या तुमच्या व्यवसायाशी संबंधित असायलाच हव्य. तुमच्या फेसबुक फ़ॆनसना प्रश्न विचारून, पोल्स घेऊन व वेगवेगळे स्पर्धा घेऊन गुंतवून ठेवा. तुम्ही हे सगळे करून सुद्धा तुमचे फेसबुक मार्केटिंगचा उपयोग होत नसेल तर एखाद्या अजन्सीला तुमचे फेसबुक पेज हाताळण्यासाठी आउटसोर्स करा.

३ रे कारण: तुम्ही तुमचे प्रोडक्ट किवा सर्विस विकतच नाही
तुमचे फेसबुक पेज खूप प्रसिद्ध आहे आणि त्यातून तुम्हाला ROI (return of investment) मिळत नाही तर त्याचे कारण आहे कि तुम्ही सेल साठी विचारातच नाही. ४ ते ५ इंफोर्मेटीव किवा विनोदी किवा इतर काही पोस्ट्स नंतर १ पोस्ट्स तुमच्या प्रोडक्ट किवा सर्विसला अनुसरून टाका. त्या सेल्स पोस्ट ला तुमच्या वेबसाईटची लिंक द्या म्हणजे तुमच्या वेबसाईटच्या विसिटस वाढतील व त्यातून लोक तुमचे प्रोडक्टस किवा सर्विस घेतील.
परत तुम्हाला हेच सांगू इच्छितो कि जर फेसबुक मार्केटिंग हा तुम्हाला एक कठीण टास्क वाटत असेल तर एखाद्या अजन्सीला तुमचे फेसबुक पेज हाताळण्यासाठी आउटसोर्स करा.

४ थे कारण: पेज इंसाईटसकडे दुर्लक्ष करणे
फेसबुक इंसाईट नावाचे खूप छान टूल फेसबुक ने फेसबुक पेजवर कोण फोलो करतायत कोण जास्त प्रतिसाद देतायत ते मोजण्यासाठी बनवले आहे. हि सेवा फक्त पेज साठी असून पर्सनल प्रोफाईलसाठी नाही आहे. म्हणूनच तुमच्या व्यवसायाचे प्रोमोशन करण्यासाठी तुमची पेर्सनल प्रोफाईल न वापरता पेज वापरा.
एकदा का तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या नावाने फेसबुक पेज तयार केला कि कमीत कमीत ३० लिएक्स पूर्ण केल्यावर आपण इंसाईट्स बघू शकता. यात तुम्हाला कुठल्या क्षेत्रातून तुमचे पेज बघितले जाते, किती वयोगटातले लोक ते बघत आहेत, यातून तुम्हाला तुमचा टार्गेट ऑसियंस पर्यंत पोचतंय कि नाही हे सुद्धा पडताळता येते. तुमच्या केलेल्या पोस्ट्सना किती लीके मिळाल्या, किती शेर्स झाले, किती कमेंट आले आणि ती पोस्ट किती लोकांपर्यंत पोचली हे समजते. ह्यातून तुम्ही काय पोस्ट केले पाहिजे व कुठल्या वेळेस लोक बघतात ह्या सगळ्या गोष्टींचा मोजमाप समजते. तुमच्या वेबसाईट ला कुठल्या पोस्टमुळे जास्त ट्राफिक आले ह्याचा अंदाज घेऊ शक्ता.

Nikhil Santosh Mahadeshwar.
Information Security Expert & Futurist

+91 9773170378
nikhil@feathersgroup.com

5 thoughts on “Facebook मार्केटिंग न चालण्याची करणे व त्यावरील उपाय

Leave a Reply

Your email address will not be published.